Ad will apear here
Next
दीप्ती नवलना बनवायचा होता अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट
मुंबई : ‘ज्येष्ठ अभिनेत्री, लेखिका दीप्ती नवल यांनी प्रसिद्ध भारतीय चित्रकर्ती अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट काढण्याचे ठरवले होते. त्यासाठी खूप संशोधनही केले होते,’ अशी माहिती अभिनेता जिम्मी शेरगिलने अलीकडेच एका कार्यक्रमात दिली. अमृता शेरगिल यांच्या कार्याची माहिती होण्यासाठी त्यांच्यावरील चित्रपट आजच्या काळात नक्कीच यायला हवा, असे मतही त्याने व्यक्त केले.

अमृता शेरगिल म्हणजे जिम्मी शेरगिलच्या वडिलांची काकू. त्यांच्यासंदर्भातील काही आठवणींना वेळच्या आठवणींना उजाळा देताना जिम्मी म्हणाला, ‘साधारण तीस वर्षांपूर्वी दीप्ती नवल यांना अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट करण्याची इच्छा होती. त्याकरिता त्यांची माहिती मिळवण्यासाठी त्या धडपडत होत्या, संशोधन करत होत्या. त्या निमित्ताने त्या आमच्या घरी आल्या होत्या. त्या वेळी आम्ही उत्तर प्रदेशमध्ये राहत होतो आणि मी तेव्हा शाळेत जात होतो. दीप्ती नवल आमच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटल्या आणि माहिती घेतली. त्यांनी या विषयावर खूप काम केलं असल्याने त्यांच्याकडे माहितीचे भांडार आहे.’ तो चित्रपट प्रत्यक्षात आला नाही; मात्र तो आता यायला हवा, असे वाटत असल्याचे जिम्मीने सांगितले. 

अमृता शेरगिल या हंगेरियन-भारतीय वंशाच्या चित्रकार होत्या. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला उदयाला आलेल्या स्त्री चित्रकार आणि आधुनिक भारतीय कलेच्या प्रणेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात. डिसेंबर १९४१मध्ये गूढ कारणाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण आजही उलगडलेले नाही. 

‘आजही कोणाला अमृता शेरगिल यांच्यावर चित्रपट करण्याची इच्छा असेल, तर माझ्याकडे यावे, काही माहिती हवी असेल तर मी मदत करायला तयार आहे,’ असेही जिम्मीने सांगितले. ‘एखाद्याने आयुष्यात खूप चांगले काम केले असेल, तर त्या व्यक्तीवर चित्रपट निघाला पाहिजे. कलाकार,  दिग्दर्शक, निर्माते यांची इच्छा असेल, तर त्यात काही अडचण येऊ नये,’ असे मतही त्याने व्यक्त केले.  

हा ४७ वर्षीय अभिनेता ‘साहेब बिवी और गँगस्टर थ्री’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिग्मांशू धुलिया दिग्दर्शित या चित्रपटात साहेब आदित्य प्रताप सिंग ही व्यक्तिरेखा जिम्मी साकारत आहे. संजय दत्त, माही गिल आणि चित्रांगदा सिंग यांच्याही यात भूमिका आहेत. २७ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZMUBQ
Similar Posts
प्रादेशिक भाषांचे चित्रपट पहा बिगफ्लिक्सवर मुंबई : अनिल डी. अंबानी यांच्या रिलायन्स एन्टरटेन्मेंटचा बिगफ्लिक्स हा चित्रपटांसाठीचा पहिलावहिला प्लॅटफॉर्म आता जगभरातील प्रेक्षकांसाठी ब्लॉकबस्टर ठरला आहे. रिलायन्स एन्टरटेन्मेंटने नऊ भाषांतील ‘बिगफ्लिक्स’ची घोषणा करून जागतिक बाजारपेठेत बहु-भाषिक अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. या अॅप्लिकेशनला भारतासह परदेशातही मोठा प्रतिसाद लाभत आहे
देस-परदेस... प्रदर्शन मांडणीचा अस्सल नमुना नव्या संकल्पना, शक्यता लक्षात घेऊन प्रदर्शन मांडणे आणि एका प्रकारे एकात्म अनुभव देणे ही एक डिझाइन शाखा गेल्या दोन दशकांत निर्माण झाली आहे. भारतात गेल्या काही वर्षांत या प्रकारे प्रदर्शन मांडणी होताना दिसू लागली आहे. त्याचे उदाहरण म्हणजे मुंबईत झालेले ‘देस-परदेस’ हे प्रदर्शन. ‘स्मरणचित्रे’ सदरात आज त्या प्रदर्शनाबद्दलच्या लेखाचा पहिला भाग
मुंबईचा ठग : दी बॉम्बे ब्युकनर एखाद्या समकालीन चित्रकाराच्या प्रगतीचा आलेख पहायचा झाल्यास अतुल डोडियांच्या चित्रांचे उदाहरण यथोचित ठरावे. नव्या पिढीसाठी अतुल डोडियांनी नवे पायंडे निर्माण केले आहेत. जुन्या प्रतिमा घेऊन त्यांना नव्या स्वरूपात दाखवतात आणि सराईत ठगाप्रमाणे त्या प्रतिमा चक्क नव्याच दिसतात. या अर्थाने ते चित्रकलेतील मुंबईचे ठग ठरावेत
देस-परदेस : बहुसांस्कृतिक चित्रे आणि शिल्पांचे प्रदर्शन मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, ब्रिटिश म्युझियम, नवी दिल्लीचे नॅशनल म्युझियम इत्यादींच्या सहकार्यातून आणि गेट्टी फाउंडेशन व टाटा ट्रस्ट यांच्या सौजन्याने अनेक तज्ज्ञांच्या सहकार्याने ‘देस-परदेस’ हे भव्य प्रदर्शन २०१७-१८मध्ये मुंबईत साकारण्यात आले होते. त्या प्रदर्शनाची काही वैशिष्ट्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language